भावना ऋषीचा जन्म
भगवान विष्णूच्या आदेशावरून आणि ऋषिमुनी, देवदेवता यांच्या विनंतीवरून मार्कंडेय ऋषींनी पुष्पभद्रा नदीच्या काठावर आपल्या आश्रमात एक भव्य मंडप उभारून पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची जय्यत तयारी आरंभलीदेवदेवता, ज्येष्ठ ऋषी, मुनी व विद्वान पंडितांना या यज्ञासाठी आमंत्रित केले. त्यानु सार पुत्रकामेष्टी यज्ञात सहभागी होण्यासाठी अनेक ऋषी, मुनी, देवदेवता, विद्वान, पंडित आदी मंडळी यज्ञस्थळी उपस्थित झालीत. मार्कंडेय ऋषी म्हणाले, “मी व्रतस्थ बाल ब्रम्हचारी आहे परंतु यज्ञविधी यथासांग पार पाडण्यासाठी यजमानपदी सपत्निक बसावा लागतो.” अशी शास्त्र-पुराणात नोंद आहे. प्रभू रामचंद्राने सीता वनवासात असतांना राजसूय यज्ञ केला होता. प्रभू र जरी विवाहित असले तरी सीतेच्या अनुपस्थित राजसूय यज्ञाच्या यजमानपदी त्यांना बसता येत नव्हतत्यामुळे सीतेची सुवर्ण प्रतिमा यजमानपदी सोबत पत्नी' म्हणून बसवून प्रभू रामचंद्राने राजसूय यज्ञ केला असे मार्कंडेय ऋषींनी सांगून यावर उपाय सुचविण्यासाठी देवदेवतांना विनंती केली. अनेक देवदेवतांमध्ये तेथे उपस्थित असलेले अग्निनारायण म्हणाले, "देवांनो! असा विचार केल्याने आपण काहीच साध्य करू. त्यामुळे मी माझी कन्या धुम्रवती मार्कंडेय ऋषीला देवून विवाह लावून देतो ात्र या विवाहामुळे मार्कंडेय ऋषीच्या ब्रम्हचर्येचा देखील भंग होणार नाही.”या विचाराला मार्कंडेय ऋषीने व सर्व ऋषिमुनी व देवदेवता मान्यता दिले तेव्हा अग्निनारायण म्हणाले, यज्ञकुंडातून मंत्रोच्चारानंतर जे धुम्रवलय निघतील. त्यास माझी कन्या 'धुम्रवती' असे संबोधून मार्कंडेय ऋषींची पत्नी समजावे.अग्निनारायणाने धुम्रवतीचा विवाह मार्कंडेय ऋषींशी लावून दिला. (अग्नी) कुंड प्रज्वलित करून वेदमंत्र घोषांनी पुत्रकामे अग्नी यज्ञकुंडातून धुम्रवलय बाहेर निघू लागले या धुम्रवलयास मार्कंडेय ऋषींची धर्मपत्नी धुम्रवती असे संबोधण्यात आले. त्यांनी सोळा ऋत्विजांना यजमानपद स्वीकारण्यास प्रार्थना केली. त्यानुसार ऋत्विजांनी आपापले यजमानपद स्वीकारले. नियोजित वेळी शुभमूहूर्तावर सोळा ऋत्विजांनी श्रद्धापूर्वक पवित्र मंत्रोच्चाराचा जयघोष करण्यास सुरूवात केलीमार्कंडेय ऋषी व धुम्रवती यांनी विधियुक्त होम हवन केले. तेव्हा मार्कंडेय ऋषीने अग्निदेवतेस प्रार्थना केली की, अग्निनारायण मुख्य देव म्हणून श्रुती मंत्राने अग्निकुंडात हवन करीत महाघोषाने यज्ञ सुरू केले. सर्व देवदेवता व ऋत्विज मंडळी यज्ञात आहुती देऊन हा महायज्ञ निर्विघ्न पणे पार पाडीत होते.ऋत्विज मंडळींनी श्रद्धापूर्वक पाच मंत्राचा उच्चार केल्यानंतर यज्ञकुंडातून धुम्रवलयासोबत एक तेजपुंज दिव्य युवक प्रकट होऊन बाहेर आला. त्याने मार्कंडेय मुनी व धुम्रवती या मातापित्यासह ऋषिमुनी, देवदेवता व ऋत्विज मंडळींना नम्रतापूर्वक नतमस्तक होऊन प्रणाम केला.अग्नियज्ञकुंडातील पुर्णाहुती संपता क्षणीच भगवान विष्णूचा भव्य दिव्य अंश असलेला एक अत्यंत तेजस्वी, वीर्यवान दुसरा दिव्य युवक सुहास्यवदन व स्मित हास्य करीत, वेदघोष करीत त्या धुम्रवलयात स्वयंभू प्रकट होऊन बाहेर आ त्याला चार हात होते लात्याच्या हातात शंख, चक्र, गदा व धनुष्य होते हा सूर्यकांतीप्रमाणे तेज असलेला सुकुमार अति सुंदर अयोनीसंभव तरूण युवक “वैशाख शुद्ध पंचमी, मृगशिरा नक्षत्र, युक्त सिंहलग्न, शुक्रवार” रोजी स्वयंप्रकाशित झाला हा महाभाग यज्ञोपवीत (जाणवे) धारण केलेला, रत्नजडित किरीटधारक, नवरत्न रचित कुंडल धारण केलेला, सुंगध चंदनांनी युक्त, वेदघोष उच्चारित अग्निकुंडातून स्वयं प्रकटलासर्वानी त्यास नम्रतेने प्रणाम केला. लोक पितामह, सृष्टिकर्ता व प्रजननकर्ता ब्रम्हदेव या दिव्य पुरुषाच्या प्रकटीकरणाने अति आनंदित झालमार्कंडेय ऋषीला म्हटले, “हे मृकंडू तनया! हा पहिला दिव्य युवक होमकुंडातून जन्मास आल्याने ही क्रिया युगायुगांत पुढे प्रचलित होईल.” भगवान विष्णूचा दिव्य अंश असलेला हा युवक पाच मंत्रोच्चार झाल्यानंतरप्रकटल्यामुळे सर्व देव- या प्रथम दिव्य युवकाचे नाव 'भावनानारायण' असे ठेवले त्याला लाडाने 'भावना' असे म्हणण्याचे सूचित केले या दिव्य युवकाला सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला व त्याचे अभिष्टचिंतन केले. पंचपुटीचा कोणी मान-सन्मानही केला नाही. त्याच्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे तो तपश्चर्येसाठी अरण्यात निघून गेला.
युवा भावनाचे अध्ययन भावना ऋषीने आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली युवा ‘भावना'ने धर्मशास्त्र, नीतिशास्त्र व वेदाध्ययन पूर्ण करून त्यात ते पारंगत झाले ब्रम्हदेवाकडे जाऊन पुन्हा वेदाध्ययन केले आणि ते वेदऋषी म्हणून प्रसिद्ध पावले. ते लोकांस वेदविद्या प्रदान करू लागले. धनुष्यविद्येत सुद्धा ते निपुण झाले व या विद्येचाही प्रसार करू लागले. त्यांनी अनेक विद्या हस्तगत केल्यात व त्यांचाही प्रसार करू लागले. त्यांनी चौसष्ट विद्यांचा प्रसार केला. भावना ऋषी संपाधन तेव्हा आपल्या दिव्य शक्तीने आपले पिताश्री मार्कंडेय ऋषींची आज्ञा घेऊन आपल्या विद्याभ्यासाद्वारे व देवदेवतांच्या अनुमतीद्वारे कालवासुर व मलकासुर यांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली.
वस्त्रनिर्मितीची उघम
मार्कंडेय ऋषींनी भावना ऋषीस भगवान विष्णूकडे वैकुंठात पाठविले. लोकांच्या लज्जारक्षणार्थ तुमच्या वंशरूपाने मला जन्माला घातलेत. आता वस्त्रनिर्मिती कशी यासाठी मार्गदर्शन करा.” अशी प्रार्थना केली.भावना ऋषींची ही विनंती ऐकून भगवान विष्णू म्हणाले, “वत्सा! माझ्या नाभीकमलात तंतू आहेत. ते तंतू घेऊन जा व त्यापासून वस्त्रनिर्मिती कर.ती तसेच त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी पद्मनाल (कमलपुष्पाचे द) पासून वस्त्र विणण्यास सांगितले. भावना ऋषी सद्गदीत झाले त्यांनी भगवान विष्णूच्या नाभीकमलातून पद्मनाल काढले भगवान विष्णुंनी त्यांना वस्त्र निर्मिती मार्गदर्शन केले. भावना ऋषी वैकुंठातून पृथ्वीतलावर परत आल्यानंतर त्यांनी वस्त्र विणण्यासाठी स्वयंस्फूर्तीने, बुद्धिचातुर्याने व कौशल्याने एक विणकामाचे साधन तयार केलेत्यांनी आपल्या शिष्यगणाच्या साहाय्याने कमलांची फुले गोळा करून त्याच्या देठातून सूक्ष्म तंतू काढले. वस्त्रनिर्मितीचे कार्य त्यांनी सुरू केले. ही कला त्यांनी आपल्या शिष्यगणांना शिकविली. त्यांनी आपल्या शिष्यगणांच्या सहकार्याने वस्त्रनिर्मितीचे कार्य मोठ्या उत्साहाने सुरू केले.
'पद्मशाली' हे नामाभिधान
भावना ऋषी आपल्या शिष्यगणांसह वैकुंठात गेलेभगवान विष्णुंची स्तुती करून वस्त्रे त्यांना अर्पण केली. भगवान विष्णुंनी या वस्त्रांपैकी पीतवर्णाचे वस्त्र (पीतांबर) स्वत:साठी पसंत करून अंगावर परिधान केले. या प्रसंगानंतर भगवान विष्णूस पीतांबरधारी म्हणून सर्व भक्तगण संबोधू लागले. भावना ऋषी यांनी आरंभिलेल्या कार्याची स्तुती करून त्यांना शुभाशीर्वाद देतांना भगवान विष्णूच्या मुखातून सहजोद्गार निघाले. ते असे- “धन्य तुम्ही पद्मशाली” (भले रे पद्मशाली). तेव्हापासून भावना ऋषी आणि त्यांच्या वंशजांना 'पद्मशाली' हे जातीवाचक नामाभिधान प्राप्त झाले. यानंतर भावना ऋषींना इंद्रादी देव, देवता व प्रमुख, श्रेष्ठ ऋषिमुनींना पद्मतंतूपासून तयार केलेले रंगीत, तलम वस्त्रे व यज्ञोपवीत भक्तिपुरस्सर अर्पण करून त्यांचा शुभाशीर्वाद मिळविला. समस्त मानवजातीच्या लज्जारक्षणार्थ भावना ऋषीने केलेले हे कार्य फारच उल्लेखनीय आणि स्पृहनीय आहे.
भगवान शंकराचा आशीर्वाद
आपण तयार केलेले रंगीत तलम वस्त्र भगवान शंकरास अर्पण करावे व दैत्यराजला ठार मारण्यासाठी आशीर्वाद घ्यावे या शुद्ध हेतूने काही निवडक रंगीत तलम वस्त्रे घेऊन भावना ऋषी आपल्या शिष्यगणांसह कैलासात गेले भगवान शंकराला नम्रतापूर्वक नमस्कार करून त्यांची स्तुती केली आणि सोबत आणलेले उत्तमोत्तम रंगीत तलम वस्त्रे व विधिपूर्वक तयार केलेले 'यज्ञोपवीत’ त्यांना अर्पण करून स्वीकार करण्याची प्रार्थना केली तसेच दैत्यराज कालवासुराला ठार मारण्यासाठी मार्गदर्शन करून आशीर्वाद देण्याचीही प्रार्थना केली. भगवान शंकरांनी स्मित हास्य करून भावना ऋषींना म्हणाले आपण मला 'व्याघ्रांबर' आणून द्यातेव्हा तुला मी धनुष्यबाण देईन; ज्याद्वारे तू कालवासुराचा वध करू शकशील” असे म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. भगवान शंकराचे हे वचन ऐकून भावना ऋषी विन्मुख झाले. ते म्हणाले, "भगवन्! आपल्या भेटीस येतांना व्याघ्रांबर' (व्याघ्रचर्मसंपादन करूनच मी पुन्हा येईन असे स्वेच्छेने प्रतिज्ञोद्गार काढून तेथून परतले.)
सूर्यकन्या भद्रलक्ष्मीची भेट
भावना ऋषी अरण्यात इतरत्र भटकत असतांना त्यांना वाटेत देवर्षी नारद मुनी भेटले. नारद म्हणाले, "वत्सा! तुला या अरण्यात वाघ मुळीच मिळणार नाही. उदयगिरी (हृदयाद्री) पर्वतावर अर्कपुराधीश सूर्यनारायणांची कन्या व्याघ्रांबरी भद्रलक्ष्मी (भद्रावती) देवी नावाच्या कामिनीने आपल्या आश्रमात सर्व वाघांना अंकित करून ठेवले आहे. तुम्ही तिकडे गेलात तर ती तिच्याकडील सर्व वाघ तुमच्या स्वाधीन करेल. पण तुम्हाला त्या सुकन्येशी विवाहबद्ध व्हावे लागेल.” आशीर्वाद देऊन देवर्षी नारद तेथून पुढे निघून गेले. अरण्यातून मार्गक्रमण करीत करीत ते उदयगिरी (हृदयाद्री) पर्वतावर पोहोचले हे ऐकून भद्रलक्ष्मी देवीच्या निवासस्थानाचा मार्ग काढीत ते भराभर पुढे पुढे चालू लागले थोड्याच अवकाशात कुमारी आसनावर बसलेली दिसली. आपल्याकडे येत असलेल्या या धनुर्धारी पांथस्थ अभ्यागताकडे ती कुमारिका मोठ्या कुतूहलाने बघत होती. भावनाऋषी समोर येताच भद्रलक्ष्मी देवीने नम्रतेने व मर्यादेने त्यांना नमस्कार केला कुमारिकेला आशीर्वाद देऊन ते स्थानापन्न झाले. तेथे येण्याचा त्यांनी आपला उद्देश सांगितला आणि एका वाघाची मागणी केली. सूर्यनारायण कन्या भद्रलक्ष्मी म्हणाली, “आपणास एकाच वाघाची आवश्यकता आहे परंतु आपण मनात आणले तर एकच काय या सर्वच वाघांचे स्वामी होऊ शकता!” म्हणाली, “योग्य अशा पुरुषाअभावी मी अद्यापपावेतो अविवाहित राहिले आहे माझ्यावर आपली कृपा असावी. माझी ही अट मान्य करा. माझ्याशी लग्न केल्यावर आपणास व्याघ्र मिळेल”. भद्रलक्ष्मी देवीला पाहिल्यापासून भावना ऋषीच्या अंतकरणात प्रेमोद्भव उत्पन्न झाला होता. त्यामुळे तिच्या या वक्तव्याने चित्तामध्ये आनंद होऊन भावना ऋषी म्हणाले, “तुझ्यासारखी दिव्य देवकन्या मला सहधर्मचरिणी म्हणून लाभणे हे मी माझे परमभाग्य समजतो. लोकहितास्तव आरंभिलेल्या लोकहितकार्यात तुझे मला यथायोग्य साहाय्यही होईल मी वचनबद्ध असल्याने प्रथम मला भगवान शंकराला 'व्याघ्रचर्म' अर्पण करावयाचे आहे ते माझे पवित्र कर्तव्य आहे. यातून मी मुक्त झाल्यावर आपण विधिपूर्वक विवाहबद्ध होऊ!” तसेच ते म्हणाले, भगवान शंकराला व्याघ्रचर्म अर्पण करण्याच्या माझ्या कार्यसिद्धीपूर्वीच मी लग्न केल्यास मी भ्रष्ट ठरेनत्यामुळे माझे पवित्र कार्य तू अजिबात रोखू नकोस. हे ईश्वरकार्य आहे. मी हे ईश्वरकार्य आटोपून स्वत विवाहासाठी तुझ्याकडे येईन.
भगवान शंकरास व्याघ्रांबर अर्पण
भावना ऋषींचे वक्तव्य ऐकन भद्रलक्ष्मी देवी म्हणाली “हे मुनीवर्या! आपली अट मला मान्य आहे.” तिने एका सशक्त वाघास पाचारण केले लगेच एक वाघ हजर झाला. एक भला मोठा रंगीत पट्टेदार वाघ समोर उभा असलेला पाहून आता याचे चर्म कसे काढता येईल याचा विचार भावना ऋषी करू लागले अहिंसा हे त्यांचे ब्रीद असल्याने वाघाची हत्या करणे हे त्यांना पटत नव्हते. म्हणून त्यांनी मंगलमय भगवान शंकराचे स्मरण केले आणि एका पात्रात उदक घेऊन वेदांमधील काही पवित्र मंत्रोच्चार खड्या सुरात म्हणावयास सुरूवात केली आणि त्या वाघावर उदकातील पाण्याचे अभिसिंचन करण्यास प्रारंभ केला .थोड्याच वेळात एक अद्भुत चमत्कार घडून आलासाप जशी आपली कात टाकतो, त्याचप्रमाणे त्या वाघाचे अंगावरील कातडी आपोआप वेगळी होऊन खाली पडली आणि तो वाघ पूर्ववत तसाच जिवंत राहिला त्याच्या अंगावर नवीन कातडी आपो निर्माण झाली. यामळे तो वाघ आता हा चमत्कार बघून भद्रलक्ष्मी देवीस आपल्या भावी पतिराजच्या सामर्थ्याविषयी जास्तच अभिमान वाटू लागला आपले कार्य सिद्धीस जात असल्यामुळे आनंदित होऊन भावना ऋषींनी भद्रलक्ष्मी देवीचा निरोप प्रेमाने घेतला व आपण भगवान शंकरांना व्याघ्रांबर' अर्पण करून लवकरच परत येतो, असे तिला आश्वासन दिले नंतर ते तेथून निघाले. इकडे भद्रलक्ष्मी देवी आपल्या भावी वैवाहिक जीवनाची सुखस्वप्ने रंगवीत त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहू लागली. व्याघ्रचर्म संपादन करून भावना ऋषी आपल्या आश्रमी परत आले. त्यांनी त्या व्याघ्रचर्माचे मोठ्या कौशल्याने सुरेख व्याघ्रांबर' तयार केले त्यांनी कैलासात जाऊन मोठ्या भक्तिभावाने व विनम्रपणे भगवान शंकरांना ते व्याघ्रांबर अर्पण केले. सुरेख व तलम व्याघ्रांबर पाहून भगवान शंकरांना अत्यानंद झाला. त्यांनी ते व्याघ्रांबर अंगावर परिधान केले आणि भावना ऋषींची प्रशंसा केली. तसेच दैत्यराज कालवासुराचा वध करण्यासाठी त्यांनी भावना ऋषींना एक धनुष्यबाण दिला आणि 'तू विजयी होशील' अशा यशस्वीभव आशीर्वाद दिला. भावना ऋषींनी सूर्यनारायणकन्या भद्रलक्ष्मी देवी हिच्या विषयीचा सर्व वृत्तांत कथन करून भगवान शंकराला सांगितला आणि आपल्या विवाहास विनयपूर्वक त्यांची अनुज्ञा मागितली तेव्हा भगवान शंकरांनी त्यांचे अभिष्ट चिंतून त्यांना तसे करण्यास संमती दिली. त्यामुळे भावना ऋषींना अतिशय आनंद झाला. हे भगवन्! आमच्याकडून व्याघ्रचर्म घेऊन आपणाकडे आलेले भावना ऋषी आपणास व्याघ्रांबर अर्पण केल्यानंतर आमच्या भद्रलक्ष्मी देवीशी लग्न करण्याचे त्यांनी अभिवचन दिले आहे. शिवाय आमची भद्रलक्ष्मी देवी भावना ऋषीवर अनुरक्त झाली असून भावना ऋषी निरोप घेऊन परत गेल्यापासून तिने अन्नपाणी वर्ज्य केले आहे. हे सर्व ऐकून भगवान शंकर सूर्यनारायणाला म्हणाले, “हे सूर्यदेवा! तुझी कन्या भद्रलक्ष्मीदेवी भावना ऋषीला देऊन तुम्ही तिचा विवाह करून द्यावा." या प्रस्तावास सूर्यनारायणाने अतिशय आनंदाने होकार दिलाभगवान शंकराने बृहस्पतीची आठवण काढताच बृहस्पती तत्काळ नमस्कार करीत समोर प्रकट झालेभगवान शंकरांनी बृहस्पतींना भावना ऋषी व भद्रलक्ष्मीदेवी यांच्या नावावरून गुणविशेष बघण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी दोघांच्याही कुंडल्या तयार करून पाहिल्या असता दोघांचे ३६ गुण जुळतात व दोघांचे लग्न शुभमुहूर्तावर करण्यास काहीच हरकत नाही असे सांगितले तसेच माघ शुद्ध सप्तमीला रविवार मकर राशीच्या शुभमुहूर्तावर लग्न करण्यास हरकत नाही असे सांगितले. सूर्यनारायण कन्या भद्रलक्ष्मी देवीला अतिशय आनंद झाला ती आपल्या दासींसोबत परत निघाली. त्यानंतर भावना ऋषीही भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन परत निघाले.
भावना ऋषींचा विवाह
भावना ऋषी भगवान शंकराना व्याघ्रांबर अर्पण करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पिताश्री मार्कंडेय ऋषी यांचेकडे आलेत्यांना सांष्टाग नमस्कार केला. सूर्यनारायण कन्या भद्रलक्ष्मी देवी विषयी सर्व वृत्तांत कथन करून सांगितला आणि आपल्याविवाहास विनयपूर्वक अनुज्ञा मागितली पुत्राच्या शौर्याचा पित्याला अत्यंत आनंद झाला. त्याचे अभिष्ट चिंतन करून लग्नास अनुज्ञा दिली. भावना ऋषी आपल्या आश्रमी परत आल्यावर त्यांनी सर्व प्रमुख ऋषिमुनींना बोलावून त्यांना आपला विवाह निश्चित झाल्याचे वर्तमान सांगितले हे ऐकून सर्वांना आनंद झाला. तसेच भगवान शंकराने सर्व देवदेवतांना बोलावून माघ शुद्ध सप्तमी रविवार मकर राशीच्या शुभमुहूर्तावर भावना ऋषी व भद्रावती (भद्रलक्ष्मी) देवीचे लग्न ठरल्याचे सांगितले आणि सर्वांना लग्नासाठी आंमत्रित केले. माघ शुद्ध सप्तमी रविवार हा लग्नाचा दिवस उजाडला लग्नासाठी पार्वती देवी व भगवान शंकर नंदीवर आरूढ होऊन तर ब्रम्हदेव व सरस्वती देवी हंसावर आरूढ होऊन तसेच इंद्रदेव व शचीदेवी आदी उदयगिरी (हृदयाद्री) पर्वतावर लग्न मुहूर्तावर उपस्थित झालेतसेच इतर देवदेवता व ऋषिमुनींही आपल्या धर्मपत्नीसह उदयगिरी पर्वतावर उपस्थित झाले. विद्वान, पंडित व ब्राम्हण मंडळीही उपस्थित झाले. तेव्हा या नव दांपत्य उभयत्यांनी सूर्यनारायणाला नमस्कार केला. त्याचप्रमाणे लग्नमंडपात जमलेल्या सर्व देवदेवता, ऋषिमुनी आदींना उभयतांनी मोठ्या भक्तिभावनेने विनम्रपणे नमस्कार केला तेव्हा सर्व दासदासींना आणि सर्व वाघांना सोबत घेऊन उभयता पती-पत्नी भगवान शंकराकडे आले. या नव दांपत्याने विनयपूर्वक भगवान शंकराला नमस्कार केला. तसेच या उभयत्यांनी विनंतीपूर्वक प्रार्थना करून याचना केली की, “यातील कोणता वाघ आवडतो तो तुम्ही घ्या.” वाघाच्या समूहातील एका वाघाला भगवान शंकराने स्वीकारले तेव्हा स्वीकारलेल्या वाघातून एक सुंदर स्त्री अवतरली. ती स्त्री भगवान शंकराची स्तुती करीत म्हणाली “हे प्रभो! दुर्वास महामुनीच्या शापाने मला वाघाचे शरीर मिळाले आहे.” त्या स्त्रीने व्याघ्रवल्कल भगवान शंकरास दिले व त्या स्त्रीचा आत्मा शिवमय झाला. भगवान शंकर प्रसन्न होऊन भावना ऋषीस म्हणाले मी केलेली आज्ञा आपण पाळल्याने तू माझा अतिशय प्रिय झालास. तू भगवान विष्णू नारायणाचा अंश आहेस. त्यामुळे आम्हा त्रिमूर्तीना देखील तू प्रिय असशील. “आजपासून तू सुद्धा व्याघ्र वाहनारूढ होऊन राहशील. त्यानंतर बसवचंद्र, नागेंद्र, विघ्नेश्वर, वीरभद्र, सिंह आदी शक्ती तू मिरवशील असा वर दिला.” तेव्हापासून भावना ऋषीचे वाहन वाघ झाले.
कालवासुराचा व मलकासुराचा वध
विवाहविधी यथासांग पार पडल्यानंतर लग्नाची वरात निघाली भावना ऋषी भद्रावती देवीस सोबत घेऊन एका सुदृढ व्याघ्रावर आरूढ होऊन निर्भयतेने आपल्या आश्रमी जात होते. त्याबरोबर त्यांच्या मागोमाग इतर सर्व वाघ जाऊ लागले. ही प्रेक्षणीय व अलौकिक वरात पाहावयास असंख्य लोक जमा झाले होते ही वरात विशालनगरातून जात होती. दैत्यराज कालवासुर हा विशालनगराचा राजा होता. दैत्यराज कालवासुराने भावना ऋषी व भद्रावती देवीची ही भव्य वरात बघितली आणि “कोण रे तू? असे दरडावून भावना ऋषीस विचारले. मला पाहून थांबतनाहीस का? माझे साहस, बळ, पराक्रम तुला माहीत नसल्याने पत्नीसोबत बेडरपणे जात आहेस.” तेव्हा भावना ऋषी म्हणाले, “अरे लोककंटका, नराधमा, राक्षसाधमा, दुष्टा, तुझे मी नाव ऐकून आहेतुझी पापी कृत्ये संपविण्यासाठी, तुझा देवदेवतांना होत असलेला त्रास नष्ट करण्यासाठी, तुला ठार मारण्यासाठीच माझा जन्म झाला आहे आता तुझा अंतिम क्षण जवळ आला आहे. हिंमत असेल तर मरणाला सज्ज हो!” हे ऐकून दैत्यराज कालवासुराला भयानक राग आला त्यामुळे “माझ्याशी युद्धाला सज्ज हो!” अशी ललकारी दैत्यराज कालवासुराने भावना ऋषींना दिली. भावना ऋषी हसत हसत युद्धास सामोरे झाले कालवासुर व भावना ऋषी यांच्यात घमासान प्रचंड युद्ध झाले. या युद्धाची वार्ता सप्तलोकांमध्ये जाऊन पोहोचली. या युद्धाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. प्रयत्नपूर्वक शिकस्तीने युद्ध करून देखील दैत्यराज कालवासुर मरता मरेना. रक्ताची पाटे वाहू लागली भगवान शंकराचे स्मरण करून भावना ऋषींनी दिव्यदृष्टीने दैत्यराज कालवासुराचे मरण कोठे आहे हे जाणले. "कालवासुराचे रक्त खाली न सांडता युद्ध केल्यासच कालवासुराचा वध होईल” हे भावना ऋषीचे लक्षात आले. भद्रावती देवीने आपल्या सर्व वाघांना आदेश दिला की, कालवासुराचे रक्त खाली जमिनीवर सांडू न देताच वरचेवर ते पिऊन टाका अशा रीतीने भद्रावती देवीने आपल्या सामर्थ्याने वाघाची जीभ लांब करून टाकली. युद्धाप्रसंगी कालवासुराचे रक्त जीभ लांब करून ते वाघांनी वरचेवर पिऊन टाकण्याचा सपाटा लावल्याने कालवासुराचे रक्त खाली जमिनीवर पडेनासे झाले. कालवासुराचा अंत्य समय जवळ आला होता. भगवान शंकराची भावना ऋषीने मनोमन प्रार्थना केली आणि त्यांनी दिलेल्या धनुष्यबाणाने नेमके लक्ष साधून कालवासुराचा शिरच्छेद केला तो महाकाय व बलिष्ठ मदांध दैत्यराज कालवासुर धरणीवर धाडकन कोसळला आणि मृतकाय झाला अशा प्रकारे कालवासुराला भावना ऋषीने यमसदनी धाडले. हे महाभयंकर दृश्य पाहून त्याचे सर्व सैन्य गर्भगळीत होऊन पळून गेले. आपला भाऊ कालवासुराचा वध झाल्याची हकिकत ऐकून दैत्य मलकासुर युद्धासाठी सज्ज होऊन धावत आला दैत्य मलकासुर समोर दिसताच एका क्षणातच त्याच्या डोक्याचे तुकडे तुकडे करून भावना ऋषींनी त्याला मारून टाकले दैत्यराज कालवासुर व दैत्य मलकासुर मेल्याची वार्ता देवदेवतांना समजली. सर्व देवदेवतांनी, संतोषाने, आनंदाने भावना ऋषींचा जयजयकाराचा घोष करीत पुष्पवृष्टी केली. भावना ऋषी, कालवासुर दैत्याशी युद्ध करीत असतांना त्यांचा घाम गळून जमिनीवर पडला होतातेव्हा त्या ठिकाणी घामातून एक बालक उत्पन्न झाला. हे भावना ऋषींना माहीत नव्हते. युद्धात विजय संपादन करून भावना ऋषी भद्रावती देवीसह वाघावर आरूढ होऊन आश्रमाकडे निघाले होते. तेव्हा मागून बाबा! बाबा! म्हणत असल्याची हाक त्यांना ऐकू आलीही हाक कोणाची आहे हे जाणून घेण्यासाठी भावना ऋषींनी मागे वळून पाहिले असता त्यांना एक सुंदर बालक दिसले. भावना ऋषीने त्याला विचारले, “बालका, तू कोण रे? तेव्हा ते बालक म्हणाले, मी आपला सुपुत्र आहेतू आमचा पुत्र कसा? त्यावर विश्वास कसा ठेवायचा? असे भावना ऋषींनी विचारले. तेव्हा आकाशवाणी झाली. “हे भावनारायण, भावनाऋषी ! ही कालवासुर व मलकासुर या दैत्यांशी युद्ध करतांना तुमचा घाम भूमीवर पडून त्यातून हा बालक जन्मला. त्याचा तू स्वीकार करावा.” आकाशवाणीचे हे शब्द प्रमाण मानून सोबत येणाऱ्या सर्व वाघांचा तू सांभाळ करीत जाअसे त्या बालकास आज्ञा केली आणि त्याला सोबत येण्यास सांगितले. भावना ऋषी आपली पत्नी भद्रावती देवी आणि सर्व दास-दासी व लव्याजम्यासह आपल्या आश्रमात येऊन दाखल झाले. .
नंदकासुराचा वध
भावना ऋषीच्या उत्कर्षामुळे दैत्य नंदकासुर पेटून उठला. त्याला हा उत्कर्ष पाहवेनासा झाला, त्याला भावनाऋषीचा हेवा वाटू लागला आपल्या मामाच्या वधाचा सूड घेऊन वस्त्रनिर्मिर्तीचा व्यवसाय हस्तगत करण्याच्या हेतूने दैत्य नंदकासुराने आपल्या सैन्याची जुळवाजुळव केली व मोठी फौज उभारली अतिशय त्वेषाने त्याने भावना ऋषीवर अचानक हल्ला केला. भावना ऋषी यांच्यावर भगवान शंकराचा वरदहस्त असल्याने ते मुळीच घाबरले नाही त्यांनी मोठ्या चपळतेने आपले धनुष्य सज्ज केले आणि मंत्रोच्चारपूर्वक अत्यंत वेगाने एका मागून एक आपले 'दिव्यबाण' त्या समग्र राक्षस सेनेवर सोडण्यास सुरूवात केली बाणांच्या वर्षावामुळे अनेक राक्षस धारातीर्थी पडले. राक्षस सेनेची त्रेधा तिरपट उडाली. तेवढ्यात एक बाण नेमका नंदकासुर दैत्याच्या मर्मस्थानी लागला. त्यामुळे तो तत्काळ धारातीर्थी पडला, मरण पावला. त्याच्या बहुतेक सैन्यांचा नाश झाला होता बाकीच्या सैन्याला व्याघ्र समूहाने उधळून लावले. याप्रमाणे राक्षस वंशाचा नि:पात होऊन धर्मोच्छेदाची भीती नष्ट झाली. विशालनगरच्या प्रजेने सुटकेचा निःश्वास सोडला. सर्व प्रजा आनंदित झाली. यामुळे भावना ऋषी यांनी दिगंत कीर्ती मिळविली.
भावना ऋषींचा राज्याभिषेक
दक्षिणेतील विशालनगर साम्राज्याचा अधिपती नंदकासुराच्या वधामुळे व सर्व राक्षसांचा निपात झाल्यामुळे तेथे अराजकता माजली होती. या साम्राज्याचा राजाकोणाला करावे या धर्मसंकटात तेथील विद्वान मंडळी व प्रजा सापडली होती एके दिवशी विशालनगर साम्राज्यातील धर्मशास्त्र पारंगत, विद्वान विचारवंत व ऋषिमुनी भावना ऋषींच्या आश्रमी जमली आणि सर्वांनी त्यांना विनंती केली की, “विशालनगर साम्राज्याचा कोणी राजा नसल्यामुळे तेथे अराजकता माजली आहे आपल्यासारख्या कर्तृत्ववान व सामर्थ्यशाली येथील पुरुषाने, ऋषीने राजसत्ता आपल्या हाती घ्यावी व प्रजेचे हित जोपासावे.” भावना ऋषीचा अवतारच लोककल्याण व धर्मप्रसार करण्यासाठी झाला असल्याने त्यांनी त्यांचे म्हणणे तत्त्वत मान्य केले. मिती श्रावण शुद्ध पंधरा म्हणजे श्रावणी (नारळी) पौर्णिमा या शुभदिनी भावना ऋषींचा दक्षिण देशातील विराटनगर साम्राज्याचा राजा म्हणून मोठ्या थाटात, वैभवात उत्साहाने राज्याभिषेक करण्यात आला त्यांनी दिर्घकाळापर्यंत धर्मनिष्ठेने व नीतिनियमाने येथील राज्य कारभार सांभाळला. सर्व प्रजेच्या लज्जारक्षणार्थ व लोकहितार्थ वस्त्रनिर्मिती करून त्यांना रंगीत तलम वस्त्रे पुरविली राज्यात सख. समृद्धी व शांती नांदत होती. सर्व प्रजा गुण्यागोविंदाने व समाधानी वृत्तीने राहात होती. त्यांच्या राजवटीत ऋषिमुनींची यज्ञादी धार्मिक कार्ये निर्विघ्नपणे पार पडत होती. एक न्यायी व आदर्श राजा म्हणून त्यांनी जगात नावलौकिक मिळविला जगातील एक कर्तव्यदक्ष राजा व वेदशास्त्र पारंगत ऋषी म्हणून त्यांनी नावलौकीक मिळविला. सर्वश्रेष्ठ पुरुष व ऋषिमुनी यामध्ये त्यांची गणना झाली
पद्मशाली वंशाचा उदय
भावना ऋषी हे भृगुकुलातील एक ब्राम्हण होते. वेदशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आदी शास्त्रात ते पारंगत होते ते अनेक कला व विद्या संपन्न होते. ते ब्राम्हण ऋषी असूनही धनुर्धारी होते. धनुर्विद्येत ते निपुण होते. ते जसे सर्वगुणसंपन्न ब्राम्हण होते, तसेच ते सर्वगुणसंपन्न क्षत्रिय देखील होते. म्हणूनच त्यांच्यावर “विशालनगर साम्राज्याचा राजा” म्हणून प्रजेचे हित संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली कर्तव्यनिष्ठ प्रजेने त्यांचा राज्याभिषेक केला. त्यांनी ब्राम्हण धर्मासह क्षत्रिय धर्माचे पालन करून प्रजेच्या व पर्यायाने राज्याच्या सर्वांगीण प्रगती, विकास व उन्नतीसाठी कार्य केले हातमागावर विणकाम करून वस्त्रनिर्मिती करणे हा हस्तव्यवसाय जगात सर्वप्रथम उदयास आणून मानवाला वस्त्रे पुरवून मानवजातीच्या लज्जारक्षणार्थ कार्य केले त्यांच्यामुळेच पद्मशाली वंशाचा उदय झाला आणि वंशवृद्धी झाली. विराटनगर साम्राज्याला सुख, समृद्धी व भरभराटीस नेऊन प्रजेत शांतता प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी सम्राटपद सोडले कारण त्यांना सम्राट पदाचा मोह नव्हता. मुळात ते एक ऋषी होते. ते कनकांद्री प्रांतात धर्मपत्नी भद्रादेवीसह राहावयास गेले. तेथे जप, तप करून आपल्या जीवनाची कालक्रमणा करू लागले येथे त्यांनी गुण्यागोविंदाने थाटात संसार केला. अशा प्रकारे सुखी संसारात रमल्यामुळे काही दिवसानंतर भद्रावती देवीस भावना ऋषीपासून एकोत्तरशत म्हणजे १०१ पुत्रसंतान प्राप्त झाले. त्या सर्व पुत्रांचा नामकर्मादी संस्कार व उपनयन संस्कारविधी यथावकाश योग्य वेळी आटोपून त्यांना वेदाध्ययनासाठी वैदिक धर्माची दीक्षा दिलीते सर्व पुत्र आपल्या पित्याप्रमाणेच धर्मनिष्ठ व पराक्रमी निपजले. या सर्व सुपुत्रांचा त्यांनी देवकन्या, ऋषिकन्या व ब्राम्हणकन्या यांचेशी योग्य वेळी विवाह लावून दिला. भावना ऋषींनी ह्या सर्व १०१ सुपुत्रांना हातमागावर विणकाम करून वस्त्रनिर्मितीची हस्तकला शिकविली या सर्व सुत्रांनी पद्मतंतूपासून रंगीत व तलम वस्त्रनिर्मिती करून सर्व मानवजातीला लज्जारक्षणार्थ वस्त्रे पुरविली. अशा प्रकारे भावना ऋषीच्या १०१ सुपुत्रांनी वस्त्रनिर्मितीच्या या हस्तकलेचा जगात सर्वत्र प्रसार केला कमलपुष्पाच्या देठापासून सूक्ष्म तंतू काढून त्यापासून शाल, वस्त्र आदी तयार करीत राहिल्याने भगवान विष्णुनारायणाच्या मुखोद्गारामुळे त्यांना पद्मशाली' असे नामाभिधान प्राप्त झाले. ह्या १०१ कर्तृत्ववान व उद्योगी सुपुत्रांपासून वंशवृद्धी झाली त्या वंशाला पुढे पद्मशाली समाज म्हणून सर्वत्र ओळख प्राप्त झाली. भावना ऋषी व त्यांच्या १०१ सुपुत्रांपासून वृद्धिंगत झालेल्या समाजाला ‘पद्मशाली' असे सर्वजण संबोधू लागले.