श्री गणेश मंदिर भिवापुर भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापुर शहरात गणेशचौकात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ६९ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव मरु नदी किनारी वसलेले आहे.या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला चार हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशूळ ही आयुधे आहेत आणि एक हात आर्शीवाद देतांना आहे. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी.मंदिराचे बांधकाम फार जूने आहे.