This is not a Wikipedia article: It is an individual user's work-in-progress page, and may be incomplete and/or unreliable. For guidance on developing this draft, see Wikipedia:So you made a userspace draft. Find sources: Google (books · news · scholar · free images · WP refs) · FENS · JSTOR · TWL |
New article name goes here new article content ...
References
editExternal links
edit
● मोबाईलच्या पिढया व 4-G ची संकल्पना -
संगणकाच्या जशा पिढया सांगितल्याच जातात, त्याच पध्द-तीने मोबाईलच्या देखील पिढयांचा उल्लेख केला जातो. मोबाईलच्या पिढयांची नावे ही सर्व साधारणपणे त्यात झालेल्य प्रगतीनुसार व अंतर्भूत असलेल्या सुविधांच्या आधारे केलेली आहे. मोबाईलच्या पहिल्या पिढीत म्हाणजेच 1-G मध्ये केवळ बेसिक फक्शनचा समावेश होता. त्यानंतरचे 2-G मोबाईल हे आकाराने लहान व वजनाने कमी, SMS तसेच कृष्ण धवल (Black&Wight) ऐवजी रंगीत स्क्रीमनमुळे अधिक लोकप्रिय झाले. या 2-G ची पुढील सुधारित आवृत्ती म्हणजे 2.5G होती. त्याेत कॅमेरा तसेच MMS, FM Radio, Audio-Video recording vodrecor या सुविधा होत्या. शिवाय इंटरनेटही होते पण त्याचा वेग खूपच कमी होता, यापुढचा टप्पा म्हणजे 3G होय. हीच मोबाईलची तिसरी पिढी म्हणजे थर्ड जनरेशन म्हणून ओळखले जाते. यामध्ये डेटा संचारण्यालचा वेग 384Kbps ते 2Mbps पर्यत वाढला. 3-G मुळे व्हिडिओ कॉल, फाईल पाठविणे व ऑनलाईन टी.व्ही. यासारख्या सुविधांची निर्मीती करण्यात आली. आता यापुढील टप्पाण म्हणजे 4-G म्हणून ओळखली जाते. ही मोबाईल नेटवर्क विकासाची चौथी पिढी आहे. यामध्ये डेटा संचारणाचा वेग 100 Mbps ते 1 gbps ऐवढा आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट हे अधिक प्रगत झाले आहे. या नेटवर्कमुळे आपण व्हिडीओ, MP3 यांसारख्यात मोठया क्षमतेच्यां फाईल कमी वेळात डाऊनलोड करु शकतो. 4-G ही मोबाईल नेटवर्कची सर्वात प्रगत पिढी आहे. या नेटवर्कमूळे मोबाईल फोनच्या सर्वच सेवांमध्येे अमूलाग्र बदल झाले आहेत व त्यातचा दर्जा अतिशय प्रगत झालेला आहे.
● 4-G तंत्रज्ञानाची वैशिष्टये - १. गतिमान इंटरनेटची सुविधा आहे. २. आवश्यनकतेनुसार व्हीेडिओ कॉलची सुविधा. ३. टेलीव्हीजनच्याह थेट प्रक्षेपणाची व व्हीडिओ कॉन्फेरन्सिंगची सोय. ४. दृक श्राव्य, टेक्स तसेच ग्राफिक्स या सारख्या माहितीचे आदान-प्रदान. ५. माहिती प्रसारणाचा अतिजलद वेग. ६. ग्लोबल रोमिंग व नेहमी ऑनलाईन राहणे शक्य. ७. आवाज आणि दृश्यता यांचा उच्चतम दर्जा.