रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंच. टिटवाळा

रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंच ही टिटवाळ्यातील नागरिकांनी रेल्वे पॅसेंजरच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन केलेली बिगर राजकीय संघटना आहे. या संघटनेने सप्टेंबर २०१६ पासून आपल्या कार्याला सुरुवात केली आणि तेव्हा पासून अविरत संघर्ष चालू आहे. या संघटनेने आत्तापर्यंत आपल्या हक्काच्या मागण्या रेल्वे प्रशासनाकडून मान्य करून घेण्याचा साठी दिनांक ०८/११/२०१७ रोजी १८०० रेल्वे प्रवाश्यानच्या सह्यांचे निवेदन रेल्वेच्या DRM यांना देण्यात आले. प्रशासनाने त्या मागण्या दुर्लक्षित केल्या मूळे व कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ऐन दिवाळीत मंचाच्या सदस्यांनी दोन आठवडे अथक परिश्रम घेऊन पुन्हा ऐकून ११,०२४रेल्वे प्रवाश्यानच्या सह्यांच्ये निवेदन दिनांक १७/०१/२०१७ रोजी माननीय रेल्वे मंत्री ,जनरल मॅनेजर यांना देण्यात आले. या निवेदनात रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंचाने प्रवाश्यानच्या २२ मागण्या रेल्वे मंत्री व प्रशासना पुढे ठेवल्या. २२ मागण्या प्रशासनाला दिल्या नंतर रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंच टिटवाळा च्या वतीने दिनांक २२/0१/२०१७ रोजी ऐक पत्रकार परिषद आणि दिनांक ०२/०४/२०१७ रोजी ऐक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. रेल्वे प्रवाश्यानच्या मागणीसाठी मंचाने वारंवार पत्र व्यवहार,आरटीआय अर्ज व संबंधित अधिकारी यांचेकडे सततचा पाठपुरावा वणदोलन केल्यामुळे मागण्यांच्या अनुषंगाने DRM यांनी दिनांक ०९/०९/२०१७ रोजी मांचाच्या प्रतिनिधींना चर्चे साठी बोलावले व दिलेल्या आश्वासनानुसार दिनांक १०/०९/२०१७ रोजी विभागीय अधिकाऱ्यानी रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मांच्याच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन टिटवाळा स्थानक व परिसराची पाहणी केली. मांच्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक मागण्या मान्य केल्या आणि उर्वरित मागण्या लवकरच मान्य करण्याचे आश्वासन दिले. रेल्वे कडून मान्य झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे. १) जेव्हा जेव्हा रेल्वे मध्ये कोणतेही तांत्रिक बिघाड होतील तेव्हा लांब पल्ल्याच्या गाड्या टिटवाळा स्थानकात थांबवून लोकल प्रवाशी यांना यात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली तसेच सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ऐवजी लोकल ट्रेनला प्राधान्य देण्याचे लेखी स्वरूपात मान्य केले. २)टिटवाळा पश्चिम भागातील तिकीट काउंटर दोन शिफ्ट मध्ये चालू केले. ३)टिटवाळा स्थानकात दोन सरकत्या जिन्यांना मंजुरी तसेच टिटवाळा पश्चिम भागात सरकत्या जिन्याचे काम युद्धपातळीवर चालू करण्यात आले. ४)प्लॅटफॉर्म नंबर तीन वर कसारा दिशेला असलेले बंद टॉयलेट पुन्हा सुरू करण्यात आले. ५) रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ६)प्लॅटफॉर्म वर बसण्यासाठी वाढीव खुर्च्या लावण्यात आल्या. ७) टिटवाळा पूर्व येथे तिकीट काउंटर जवळ मेडिकल सेंटरचे काम चालू करण्यात आले. ८) स्थानकात कसारा दिशेला सहा मीटर रुंद पादचारी पुलाचे कामास मंजूर तसेच मुंबई दिशेला सुद्धा नवीन पादचारी पूल प्रस्तावित. ९) सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होताच जुन्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरू करणे १०)महिला ट्रेनच्या मागणीच्या ऐवजी सकाळी ८:१० या वेळी टिटवाळा दादर धीमी लोकल चालू करण्यात आली ,जिचे कसारा दिशेचे तीन डब्बे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. ११)प्लेटफॉर्मची उंची वाढवणे तसेच टिटवाळा स्थानकाचे सुशोभीकरण करणे या बद्दल मांचास आश्वासन देण्यात आले. १२)टिटवाळा पश्चिम बाजूला रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवण्यास मंजुरी १३)टिटवाळा स्थानकातील कसारा व मुंबई दिशेच्या पादचारी पुला सोबत नंतर जुना ब्रिज तोडून विस्तीर्ण नवीन पूल बांधून देण्याचे आश्वासन.(मुंबई दिशे कडील पुलाचे काम चालू आहे)(कसारा दिशेच्या पुलाचे काम लवकरच चालू करणार) या संघटनेचे ऐकच लक्ष आहे ते म्हणजे रेल्वे प्रवाश्याच्या समस्या सोडवणे व टिटवाळा स्थानकाला आदर्श व सर्व सोईंनी सुसज्ज स्थानक बनवणे आणि यासाठी मंचाचे कार्यकर्ते रात्रीचा दिवस करायला तयार आहेत.