!! जातीची पत्रकारिता !!

साधू तुमचे जमती

तिथं कंडोम चा स्टॉक

तेव्हा डोळे होते बंद

तुमचे मेंदू होते लॉक??

गंगा झाली मैली

पण ती तुम्ही नाही पहिली

प्रेतं किती सडली

तेव्हा तुम्ही नाही मोजली??

मुर्त्या जाऊन पाण्यात

प्राण मुक्या जीवांचा गेलता

सांगा काळ्या काळजाच्या पत्रांनो

तेव्हा तुम्ही कुठं गेलता??

छठ पुजांनी चौपाट्या

सजलेल्याच होत्या का मुंबईत?

सुगंध च दरवळला ना तिथं

म्हणून आला नसेल तुमच्या शाईत?

चैत्यभूमी चा कचरा

कसा भरभरून दाखवलात

लोकशाही चा खून करून

कसे जातिकडंच झुकलात

पत्रकारितेच्या नावाखाली

तुम्ही द्वेषच लागलेत आता जनायला

म्हणून लाज वाटते हरामखोरांनो

तुम्हाला लोकशाही चा स्तंभ म्हणायला

म्हणून लाज वाटते हरामखोरांनो

तुम्हाला लोकशाही चा स्तंभ म्हणायला

                             ✒सनी सुभाष पगारे