काली माता मंदिर तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्टेशन[1]
भारतातील पहिली प्रवासी ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे पर्यंत धावली,पण त्यापूर्वीही देशांमधील प्रथम औद्योगिक ट्रेन ही सन १८३७ मध्ये रेड हिल्स वरुन मद्रास च्या चितंद्रीपेटकडे धावली होती.
नागपूर ते भंडारा पहिली ट्रेन १२ मार्च १८८१ रोजी धावली होती. ब्रिटिश रेकॉर्डमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नागपूर ते देव्हाडी (तुमसर रोड) पर्यंत ही ट्रेन धावली होती. या मार्गावर रेल्वे रूळ बसवितांना सूर नदीवरील पूल बराच आव्हानात्मक होता. दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच मे १८७९ दरम्यान परीसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे सदर रेल्वेचा प्रकल्प खूप लांबणीवर पडला होता.
सदर मार्गावर रुळांच्या खाली मांडण्यात येणारे लाकडी स्लीपर पुरवण्याचे काम वनविभागाला देण्यात आले होते. परंतु वन विभागाच्या दिरंगाईमुळे इंग्लंडहून २५००० पाइन स्लीपर प्राप्त करण्यात आले. रेल्वे रूळ बसविण्याचे का पूर्ण झाल्यानंतर इंग्लंड वरून वाफेचे इंजिन (Steam Locomotive) आणण्यात आले होते. कोळसा डेपो, पाणी चार्जिंगची व्यवस्था, टेलीग्राफ या सर्व व्यवस्था देव्हाडी (तुमसर रोड) ( Tumsar road junction railway station ) येथे करण्यात आल्या होत्या.
इथे असलेल्या काली माँ मंदिराची कथा खूप रंजक व रहस्यमय आहे. येथील जुनी आख्यायिका आहे की, त्यावेळी इथे बंगालमधून आलेले बहुतेक कामगार रेल्वेचे काम करीत होते. ज्या ठिकाणी रेल्वेचे काम सुरू होते, त्या कामाच्या आराखड्यानुसार रेल्वे ट्रॅकच्या मध्ये काली मातेचे मंदिर येत होते. परंतु इंग्रज शासनाला सदर ट्रॅकच्या विस्ताराची गरज पडली तेव्हा मंदिर मधे येत होते. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मंदिर हलविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. काली मातेने मुख्य अधिकाऱ्याच्या स्वप्नात जाऊन हे मंदिर हलविण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत त्यांना सांगितले. जेव्हा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्यांच्या कामात आपत्तीचा सामना करावा लागला. सरतेशेवटी त्यांनी मंदिर तोडण्याचा विचार सोडून दिला आणि मंदिर तेथेच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी रेल्वे ट्रॅक समायोजित केला.आजही तुमसर रोड (देव्हाडी) स्टेशनवर दोन रेल्वे रुळांच्या मध्यस्थी हे मंदिर बघायला मिळते.
स्थानिक भाविक भक्तांनी कालांतराने या ठिकाणी देवीची सुंदर व सुबक देखण्या मूर्तीची स्थापना केली. स्थानिक भक्तगण या ठिकाणी दररोज पूजा अर्चना करतात. स्थानिक नागरिकांसोबत रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी देवीच्या पूजेत सहभागी होतात. दुर्गा मातेचा काली माता हा एक रूप आहे, त्यामुळे दुर्गा उत्सवात येथे भाविकांची गर्दी असते. जरी आख्यायिका सांगितली गेली असली तरी दोन रेल्वे ट्रॅकच्या मधोमध असलेले कालीमातेचे मंदिर एक श्रद्धेचे अढळ स्थान मानले गेले असून सध्या भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. संपूर्ण भारतात रेल्वे ट्रॅक दरम्यान हे एकमेव मंदिर असल्याची माहिती आहे.
संदर्भ- दैनिक सकाळ वर्तमानपत्र
- ^ "Sakal Newspaper". Sakal. 20/10/2020. Retrieved 23/10/2020.
{{cite news}}
: Check date values in:|access-date=
and|date=
(help)CS1 maint: url-status (link)