बर्फ
बर्फ कसा बनतो हिमग्बंडांच्या अभ्यासानंतर स्पष्ट झाले की, ज्यावेळी उणे २ अंश सेल्सिअस तापमान झाले की बर्फ जमू लागतो.त्यापेक्षाही कमी म्हणजे उणे ५ सेल्सिअस तापमान असले की एकदम सपाट स्फटिक बनतात.हिमवृष्टीवेळी असेच स्फटिक टोकदार बनतात.
बर्फ कणांचा कॅटलॉग : 'कंपौंड इंटरेस्ट' या विज्ञान ब्लॉगचे संस्थापक अंडी ब्रनिंग यांनी ३५ वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्रोफ्लेक म्हणजेच बर्फाच्या तुकडयांचे वर्णन केले आहे . यापेक्षाही अधिक प्रकारचे हिमखंड पाहायला मिळत असतात. ध्वनीचे शोषण : ज्यावेळी हिमवर्षाव होत असतो. त्यावेळी हिमकण वातावरणातील ध्वनी शोधून घेत असतात. त्यामुळे हिमवर्षावावेळी आजुबाजूचे वातावरण शांत होते. बफांची नावे : स्कॉटलंडमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार जगभरात बर्फाला ४२१ नावे आहेत . उत्तर धुवाच्या परिसरात राहणा-या 'इनपुट' या आदिवासी लोकांनी तर बर्फाला ५0 वेगवेगळी नावे ठेवली आहे. मनुष्यासाठी हानिकारक : जर हिमवर्षाव सुरू असेल तर तिथे अधिक काळ घालवणे माणसाच्या आरोग्यासाठी चांगले नाही. तसे झाले तर आर्टिक हिस्टेरिया नावाचा आजार होऊ शकतो. उत्तर धुवाच्या आसपास राहणा-या इनपुट लोकांना अशा आजाराने वेळोवळी गासले जाते .
बर्फात कैद हवा : बर्फामध्ये ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत हवा कैद होते.याचा असा अर्थ बर्फ उष्णतेला रोखून धरतो. त्यामुळेच एस्किमो लोकांची बांची घरे 'इग्लू असोत किंवा बर्फाबानी बिळ करून राहणा-या पशुंचा निवारा असो, हे उबदार असतात.
सिद्धांत गायकवाड