" डॉ आंबेडकर सेना ‌‌‌‌‌"

या पक्षाची स्थापना २० मार्च २०१३ साली रायगड जिल्ह्यातील "महाड " या तालुक्यात चवदार तळ्याचा पाण्याला साक्ष ठेवून काढण्यात आली.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई दिनकर ठोकळ यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथिल शेकडो कार्यकर्ते पक्षामध्ये सहभागी झाले होते. औरंगाबाद ते महाड येथे क्रांती ज्योत घेऊन बहुजनांच्या हितासाठी व सत्ता पासून वंचित असलेल्या घटकांसाठी हि सामाजिक संघटना लढत‌ आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर भर देणारा हा सामाजिक पक्ष लोकांच्या हितासाठी व तळागाळातील लोकांना न्याय मिळवण्याचे काम करत आहे. आंबेडकरी चळवळीतील अनेक लढे व न्याय मिळावा यांसाठी उपोषण मोर्चे सामाजिक स्तरावर करित आहे औरंगाबाद येथे "उपेक्षित कलावंतांना वेतन व न्याय मिळावा" करिता भव्य असा ऐतिहासिक मोर्चा डॉ आंबेडकर सेनेच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला तसेच मुंबईतील आंबेडकर भवन व भूषण प्रिटिंग प्रेस पाडण्यात आले या वेळी देखील मुंबई मंत्रालयवर क्रांतीकारी मोर्चा काढण्यात आला. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष समाजामध्ये परिवर्तन वादी निर्माण करणारा आहे