पनीर मसाला

साहित्य :- 250ग्राम पनीर , 3 मध्यम आकाराचे कांदे , 3 टोमॅटो , 4 -5 लसूण पाकळी, 1 इंच आळा, 1 शिमला मिरची , 1 गाजर , खडा मसाला 4 लवंग , 4 काळीमिरी, दालचिनी , तमालपत्र, 3 स्टारफुल, जिरे,मीठ ,तेल , 2 चम्मच गरम मसाला , अर्धा चम्मच हळद , 1 चम्मच तिखट मसाला.

कृती:- शिमला , गाजर आणि 1 कांदा हे 1 इंच तुकड्यात कापून घ्या. आला आणि लसूण पेस्ट करून घ्या . टोमॅटो कापून त्याची पेस्ट करून घ्या तसाच उरलेले 2 कांदे यांची देखील पेस्ट करून घ्या . कढई घ्या त्यात 4 -5 चम्मच तेल टाकून गरम झाल की त्यात सर्व खडा मसाला टाका . त्यानंतर पेस्ट केलेला कांदा टाकून परतवा सोनेरी रंग आल्यावर त्यात टोमॅटो पेस्ट टाकून परतवा . टोमॅटो तेल सोडायला लागला की त्यात सर्व मसाले टाका मसाले शिजले की त्यात पनीरचे तुकडे टाका . पनीर तेलात तळून घेतले तरी चालतील. पनीर टाकून झालं की त्यात अर्धा ग्लास पाणी ओतून कढई वर झाकण ठेवून एक उकळी येऊ द्या . उकळी आल्यावर त्यात चावी नुसार मीठ टाकून शिजू द्या . घट्ट पण आला की त्यात कापलेला कांदा , शिमला मिरची आणि गाजर चे तुकडे टाकून मंद गॅस वर शिजवा 10मी शिजवू मग गॅस बंद करा आणि त्यात थोडी बारीक चिरून कोथेंबिर टाकून पनिर मसाला खायला तयार .