Talk:Sambhajirao Kakade
This article is rated Start-class on Wikipedia's content assessment scale. It is of interest to the following WikiProjects: | ||||||||||||||||||||||||||||||
|
It is requested that an image or photograph of Sambhajirao Kakade be included in this article to improve its quality. Please replace this template with a more specific media request template where possible.
The Free Image Search Tool or Openverse Creative Commons Search may be able to locate suitable images on Flickr and other web sites. |
Babalal Kakade Deshmukh (बाबालाल काकडे देशमुख)
editबाबा लाल साहेबराव काकडे देशमुख
नीरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना विचारात घेऊन काकडे बंधूनी सोमेश्वर कारखाना स्थापन केला. कै. मुगुटराव आप्पा नंतर कारखान्याची धुरा बाबांच्या कडे आले नंतर सिंचनाच्या सुविधा वाढवून शेतकऱ्याला पारंपारिक शेतीतून बाहेर काढले. त्यांचे संचालक मंडळ बहुजन समाजातील व गुणवत्तापूर्ण असायचे. शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा कशी होईल बाबांच्या मनात हा विचार. बाबांचा हात पाठीवर असलेने कोणा शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न, शिक्षण, दवाखाना अचानक येणारे संकट यासाठी शेतकरी कधी अडून राहत नव्हता. साखर तर शेतकऱ्याला मुक्तहस्ते मिळायची.
शेतकऱ्याने शेतीवरच अवलंबून न राहता शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत यासाठी बाबांनी कारखान्यावर व कार्यक्षेत्रात महाविद्यालय, विद्यालय, व्यवसायिक अभ्यासक्रम, कॉन्व्हेंट स्कूल या शिक्षणाच्या सुविधा माफक शुल्कात सुरू केल्या. अजूनही लोकांनी कॉन्व्हेंट स्कूल या शब्दाचा अर्थ इंग्रजी शब्द कोशामध्ये पहावा निराधार, निराश्रित व गरीब व इतर असाच आहे.केवळ पैसा कमावणे हे उद्दिष्ट न ठेवता बाबांनी कॉन्व्हेंट या शब्दाला तडा जाऊ दिला नाही.
बाबांच्या यशस्वी वाटचाली मागे त्यांच्या पत्नी सौ. कै. कमल ताई काकडे या खंबीरपणे उभ्या असायच्या सार्वजनिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीनेही खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, यासाठी स्त्रियांच्या मनातील भीती घालवण्यासाठी बाबांनी सौ. कै. कमलताई काकडे यांना निंबुत गावच्या भारतातील पहिल्या महिला सरपंच केले व खऱ्या अर्थाने पंचायत राज्यपद्धतीत त्याच वेळी महिला आरक्षण दिले.
बाबा म्हणजे धडाकेबाज व्यक्तिमत्वे घडविणारे स्वाभिमानी विद्यापीठ, आधार देणारा वटवृक्ष. या विद्यापीठात स्वाभिमानी विचारांच्या पदव्या घेऊन अनेक व्यक्तिमत्वे राजकीय, सहकार कृषी क्षेत्रात व इतर क्षेत्रात कोणावर अवलंबून न राहता आपली स्वतंत्र चमक दाखवत आहेत. बाबांचे विचारांमुळे अनेक जण आमदार, खासदार, मंत्री, व मुख्यमंत्री झाले पक्ष कोणताही असो महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये अनेक मंत्री बाबांचे विचारांचे असायचे. एक वेळ पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री सुद्धा बाबांचे विचाराचे होते. बाबा वटवृक्षा सारखा आधार द्यायचे त्यांचे आधारावरच अनेकांनी आपल्या शिक्षण संस्था व उद्योग जागतिक पातळीवर नेल्या.
बाबांचा शेतकरी हाच केंद्रबिंदू असल्याने त्यांचे कडे दुजाभाव कधीच नव्हता. त्यांनी कधीही कोणाचीही अडवणूक केली नाही. माळेगाव कारखाना एकदा अडचणीत असताना बाबा त्यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन होते. बाबांनी केलेल्या मुक्तहस्त मदतीमुळे माळेगाव कारखाना सावरला परंतु सोमेश्वर कारखान्याच्या बाबतीत तसे घडले नाही, विस्तारवाढ संपत कमिटीचे पैसे मिळण्यास झालेला विलंब, साखरेचे पडलेले दर या स्थितीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बदललेल्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याकडे असलेल्या शिल्लक साखरेवर सुद्धा कर्ज दिले नाही व कारखान्याला अडचणीत आणले. तत्कालीन परिस्थिती वर आत्ता अलीकडे एका प्रबोधनकार महाशयांनी " काकडे यांना नमवले" हा शब्दप्रयोग वापरला होता परंतु त्यांना माझी विनंती आहे की झाडाखाली पडलेल्या वाळलेल्या पानावर जपून पावले टाका कारण कडक उन्हाळा असताना आपणही कधी काळी त्या झाडाच्या सावली खाली उभे होता हे विसरू नका.
बाबांच्या जवळ मनातले भाव व्यक्त करताना आदरयुक्त भीती वाटायची. त्यांचे जवळ कधी हातचे राखून बोलावे असे वाटले नाही. त्यांना कधीही फसवावे असे वाटले नाही. ज्यांच्या जवळ कधी कबुली द्यायला संकोच वाटला नाही. जे आमच्या सुखदुःखाशी एकरूप व्हायचे त्यांना आपले कर्तृत्व सांगून त्यांची थाप पाठीवर घ्यावी असे वाटायचे.
"परमेश्वरा शिवाय कोणापुढे झुकणार नाही, स्वाभिमान गहाण टाकणार नाही" ही बाबांची विचारसरणी. आयुष्यभर खडकाला धडक घेतली पण स्वाभिमानी व खानदानी विरोधक कसा असावा हे जगाला दाखवून दिले.
झाले बहु, असतीलही बहु होतील बहु परंतु बाबा सम, बाबाचं
अशा सह्याद्रीच्या महामेरूला, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला, शेतकऱ्यांच्या कैवाऱ्याला, दीनदुबळ्यांच्या आधाराला म्हणजेच बाबांना सलाम. Saivhulawale (talk) 17:21, 8 August 2020 (UTC)